Chakan Crime : चाकण येथे तरुणावर कोयत्याने वार, तिघांना अटक

एमपीसी न्यूज – कार मधून जाणाऱ्या तरुणाला दगडाने मारून थांबवले.(Chakan Crime) त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री दहा वाजताच्या सुमारास आयफेल सिटी समोर, चाकण येथे घडली.

अजय आप्पासाहेब जाधव (वय 18, रा. चाकण, ता. खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण अशोक प्रधान (वय 18), मुक्तेश्वर संतोष दिंडे (वय 21), विकी बबन येलसटे (वय 19) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह करण इंगळे (सर्व रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad News : जुन्या भांडणातून टोळक्याकडून सिंमेटच्या ब्लॉकने तिघांना बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कार मधून तळेगाव-चाकण रोडने जात होते. ते आयफेल सिटी समोर आले असता आरोपींनी त्यांच्या कारवर दगड मारून कार थांबवली. त्यात कारचे नुकसान झाले. त्यानंतर फिर्यादीस हाताने मारहाण केली. (Chakan Crime) विकी याने कोयत्याने वार करून फिर्यादींना गंभीर जखमी केले. त्यानंतर फिर्यादी त्यांच्या मित्रासोबत पळून जात असताना आरोपींनी पाठीमागून दगडफेक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.