Chinchwad News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – शाळेतून घरी जात असलेल्या अल्पवयीन(Chinchwad News) मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.हि घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी अजंठानगर, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण अंकुश म्हस्के (वय 43, रा. अजंठानगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Chakan Crime : चाकण येथे तरुणावर कोयत्याने वार, तिघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी बुधवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास शाळेतून घरी येत असताना आरोपीने तिला हातवारे करून बोलवून घेतले.(Chinchwad News) तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.