Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 44 नवीन रुग्ण; 75 जणांना डिस्चार्ज

Today new 44 corona patients in Maval, 75 persons discharged.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (मंगळवारी, दि. 13) कोरोनाचे 44 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 75 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 17 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 27 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 9, लोणावळा शहरात 3, वडगाव शहरात 5 रुग्ण आढळले आहेत.

आज 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण शिरगाव (पुरुष, 59 वर्ष), (महिला, 74 वर्ष), तळेगाव दाभाडे (पुरुष, 67 वर्ष), (पुरुष, 66 वर्ष), (महिला, 37 वर्ष), (पुरुष, 29 वर्ष) येथील आहेत. आजपर्यंत तालुक्यात 185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण

मंगळवारी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये तळेगाव दाभाडे (ग्रामीण) 5, टाकवे बु 4, शिरगाव 3, वराळे 2, माळवाडी 2, गोडुंबरे 2, कुसगाव बु, कान्हे, गहूंजे, काले, सोमाटणे, डोंगरगाव, वडेश्वर, इंदोरी, ब्राह्मणवाडी (साते) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

मावळातील 34 गावांमध्ये 15 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर 5 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 39 गावांना कोरोनाने वेढा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.