Today’s Horoscope 05 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 05 February 2024  – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार.

तारीख – 05.02.2024.

शुभाशुभ विचार – भद्रा वर्ज्य.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 07.30  ते  09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – अनुराधा 7.54 पर्यंत नंतर ज्येष्ठा.

चंद्र राशी – वृश्चिक.

—————————–

मेष – ( शुभ रंग – निळा)

कार्यक्षेत्रात कोणतीही धाडसाची कामे टाळाच. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोत. गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. झटपट लाभाच्या मोह टाळा. स्वतःवर संयम असू द्या.

वृषभ – ( शुभ रंग- लाल)

कौटुंबिक जीवनात सुसंवाद असल्याने तुम्ही आज कार्यक्षेत्रातही महत्त्वाचे निर्णय ठामपणे घेऊ शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.

मिथुन – ( शुभ रंग- गुलाबी)

क्षूल्लक वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी उभ्या राहतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना मात्र दैवाचे पाठबळ आज नक्कीच मिळेल.

कर्क – ( शुभ रंग – हिरवा)

कलाक्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च कराल.

सिंह -( शुभ रंग – मोरपंखी)

आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. काहीजण सहकुटुंब प्रवासाला निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध जुळून येतील. जिभेवर मात्र साखर असू द्या.

कन्या – ( शुभ रंग- आकाशी)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

तूळ -( शुभ रंग- चंदेरी)

आर्थिक आवक मनाजोगती राहील. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. वाणित गोडवा ठेवलात तर अनेक अवघड कामे सोपी होतील. प्रवासात त्रास संभवतो.

वृश्चिक -( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्ण अनुकूल आहे. सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. उपवरांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक तुमच्यापुढे नमते घेतील.

धनु -(शुभ रंग- जांभळा)

कौटुंबिक गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. काही जणांना अनपेक्षितपणे दुरचे प्रवास घडणार आहेत.

मकर- (शुभ रंग- मरून)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आजचा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल.

कुंभ – (शुभ रंग- केशरी)

उच्च अधिकारी वर्गाला अधिकार वापरायची वेळ येईल. नोकरीत प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज कर्तव्यालाच प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यस्त दिवस.

मीन -( शुभ रंग- सोनेरी)

आज सज्जनांच्या सहवासात चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना करावा लागेल. घरात थोरांचे मानपान जपावे लागतील.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.