Today’s Horoscope 05 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 05 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – गुरूवार.

05-01-2023

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – मृग 21.26 पर्यंत नंतर आर्द्रा. 

चंद्र राशी – वृषभ 8.06 पर्यंत नंतर मिथुन.


आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग- भगवा )

वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहारात फसवणूक होऊ शकते. सतर्क रहा. विद्यार्थी अभ्यासापेक्षा खेळातच रमतील. वाहन रस्त्यात नादुरुस्त होण्याची शक्यता आहे.

वृषभ (शुभ रंग- मोरपंखी )

आज कार्यक्षेत्रात गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल. दुरावलेले मित्रही जवळ येतील. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज दिवस लाभाचा आहे.

मिथुन ( शुभ रंग- लाल )

आपल्या कार्यक्षेत्रात इतरांस अशक्य ते तुम्ही शक्य करून दाखवाल. विरोधकांनाही तुमची मते पटवून द्याल. जेष्ठांनी प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. त्यांच्या वयाचा मान राखावा लागेल. आज एखादा अनपेक्षित खर्च उद्भवेल जो टाळता येणार नाही. आज वाद टाळून सुसंवाद साधा.

सिंह (शुभ रंग- केशरी )

कार्यक्षेत्रात प्रगती रथ वेगाने धावेल. आज मित्रमंडळीत तुमच्या शब्दास मान राहील. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज कंजूषणास लगाम घालून थोडी चैनही कराल.

Ghodegaon News : घोडेगाव येथे आयोजित आपत्ती मित्र प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट

कन्या ( शुभ रंग- मरून )

आज आळस झटकून कामाला लागल. वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचेही योग्य नियोजन केल्याने कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल. वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान देणे हिताचे राहील.

तूळ ( शुभ रंग- सोनेरी )

कार्यक्षेत्रात ध्येय प्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैव अनुकूल राहील.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम )

कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका झटपट लाभाच्या मोहाने आज निराशाच पदरी पडेल.

धनु- (शुभ रंग- डाळिंबी )

केवळ भिडस्तपणा पायी आज न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची ही गरज आहे. आज तुम्ही जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न कराल.

मकर ( शुभ रंग- निळा )

आज तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. त्यावर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात आज जोडीदाराच्या चुका काढण्याची चूक अजिबात करू नका

कुंभ (शुभ रंग – पिस्ता )

आज तरुण वर्गात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. आज  तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल. नवोदित कलाकार संधीचे सोने करतील. नोकरदारांना मात्र तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल.

मीन -(शुभ रंग – जांभळा )

गृहिणी आज घराच्या सजावटीसाठी पैसा खर्च करतील. कलाकारांना स्ट्रगल वाढवावी लागेल. प्रेमीयुगोलांनी तर आजच्या दिवस मौनव्रत ठेवणेच हिताचे राहील. लहान मुलांचे हट्ट वाढतील.

 

 

 

 

   शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.