Today’s Horoscope 06 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 06 December 2022
वार -मंगळवार
06.12.2022.
शुभाशुभ विचार- सामान्य दिवस.
आज विशेष- साधारण दिवस
राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र -भरणी 08.38 पर्यंत नंतर कृतिका.
चंद्र राशी – मेष 15.03 पर्यंत नंतर वृषभ.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- डाळिंबी )
एखादी हरवलेली वस्तू आज सापडेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी कराल घरात थोरामोठ्यांच्या होला हो करा पण वाद वाढवू नका.

वृषभ (शुभ रंग- केशरी )
काही महत्त्वाची कामे दिवसाच्या उत्तरार्धात यशस्वी होतील. घरातून रागावून गेलेली एखादी व्यक्ती दुपारनंतर परत येईल. कुणालाही कसलीही वचने देऊन शब्दात अडकू नका.

मिथुन ( शुभ रंग- राखाडी )
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांच्या शाब्बासकीस तुम्ही पात्र ठराल. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. बेरोजगारांना आज मनासारख्या नोकरीचे प्रस्ताव येतील.

कर्क (शुभ रंग- पिस्ता) – Today’s Horoscope 06 December 2022
उद्योग व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवींचे सल्ले घ्यायला कमीपणा वाटून देऊ नका. तसेच घरगुती प्रश्नही वडीलधाऱ्यांच्या मदतीने सोडवा. आज वादापेक्षा सुसंवाद साधणे हिताचे राहील.

सिंह (शुभ रंग- नारंगी )
वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल. ध्येयाच्या मागे धावताना तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. काळजी घ्या.

कन्या ( शुभ रंग- हिरवा)
मर्यादे बाहेर कोणतेही आर्थिक धाडस करू नका. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह धरू नका. कोणतेही नीतीबाह्य वर्तन अंगाशी येईल. कायद्याचे पालन तंतोतंत करा

तूळ ( शुभ रंग- लाल)
कार्यक्षेत्रात कामाच्या प्रचंड ताण असून नोकरदारांना वरिष्ठांचे समाधान करणे अवघड जाईल. वैवाहिक जीवनात संध्याकाळी काही किरकोळ स्वरूपाचे मतभेद होतील.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)
मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. आज केवळ चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल.

धनु- (शुभ रंग- मोरपंखी)
कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावराचे व्यवहार लाभ देतील. मामा मावशी कडून काही शुभ समाचार संभवतात. पोट बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर ताबा असू द्या.

मकर ( शुभ रंग- मरून )
उद्योग व्यवसायात आवक मनासारखी राहील. नोकरीच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी स्वीकारावी लागेल. बऱ्याच दिवसांनी एखाद्या प्रिय व्यक्तीचा तुम्हाला फोन येईल.

कुंभ (शुभ रंग – जांभळा)
कार्यालयीन कामानिमित्त प्रवास घडतील साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल गायक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील. गृहिणींना शेजारधर्म पाळावा लागेल.

मीन -(शुभ रंग – पांढरा )
नोकरदारांना ऑफिसला दांडी मारायचा मूड असेल मुले अभ्यासाच्या कंटाळाच करतील जुन्या मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत घालवाल.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Khadakwasla News : प्रेम विवाह केलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.