Today’s Horoscope 15 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार – मंगळवार,  दि​. 15 डिसेंबर 2020

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
  • आज विशेष –  देव दीपावली.
  • राहू काळ – दुपारी 03.00  ते 04.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मूळ 21.31 पर्यंत नंतर पूर्वाषाढा.
  • चंद्र राशी – धनु.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – पांढरा)
आज काही नकारात्मक विचार तुमच्या मनात येतील. महत्त्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या. वैवाहिक जीवनात ही जोडीदाराशी हातचे राखूनच बोला.

वृषभ – (शुभ रंग – डाळिंबी)

तुमचे मनोबल उत्तम राहील तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. दुपारनंतर थोडी अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार दुपारपूर्वी उरकून घ्या.

मिथुन (शुभ रंग – तांबडा)
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड उत्साह राहील.  खर्च वाढत असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

कर्क – (शुभ रंग – गुलाबी)
नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. घरी पत्नीचेही मूड सांभाळाल. आज तब्येत जरा नाजुकच असेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

सिंह – (शुभ रंग – सोनेरी)
कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. आज आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष द्याल. प्रेमवीरांना वेळेचे भान राहणार नाही. कार्यक्षेत्रात विरोधक माघार घेतील.

कन्या – (शुभ रंग – आकाशी)
कौटुंबिक काही वाद असतील तर दुपारनंतर ते सुसंवादाने मिटतील. प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील.

तूळ  (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्त्वाचे मेल्स येणार आहेत दुपारनंतर प्रवासास निघावे लागेल. गृहिणींचा शेजारी सलोखा वाढेल. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास कंटाळवाणा वाटेल.

वृश्चिक – (शुभ रंग – मोरपंखी)
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील. आज खिशात पैसा खेळता असल्याने अनेक अवघड कामे सोपी होतील.

धनु (शुभ रंग – मरून)
आपले म्हणणे इतरांना पटायलाच हवे असा अट्टाहास करून चालणार नाही. इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. एखादी गहाळ झालेली वस्तू पुन्हा शोधलीत सापडेल.

मकर – (शुभ रंग – मोतीया)
विविध मार्गाने आलेला पैसा आज विविध मार्गाने जाईल. आज गरजूंच्या मदतीला धावून जाल. वडीलधार्‍या मंडळींशी वैचारिक मतभेद होतील. त्यांच्या वयाच्या मान राखाल.

कुंभ (शुभ रंग – राखाडी)
तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी व्यवसाय वाढीच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. काही भाग्यवंतांना नव्या घराचा ताबा मिळेल.

मीन – (शुभ रंग – जांभळा)
नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधकांचा जोर कमी झाल्याचे जाणवेल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. ध्येयाकडे यशस्वी वाटचाल कराल.

( MPC News च्या सर्व वाचकांना आमच्याकडून दिवाळीनिमित्त भरपूर शुभेच्छा 🙏)
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.