Today’s Horoscope 20 April 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – मंगळवार, दि. 20 एप्रिल2021

  • शुभाशुभ विचार – १२ नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष – दुर्गाष्टमी.
  • राहू काळ – दुपारी ३.००  ते ४.३०.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पुनर्वसु ०६.५३ पर्यंत नंतर पुष्य नक्षत्र.
  • चंद्र राशी – कर्क.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – मरून)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल आवक पुरेशी असेल. परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढतच राहणार आहेत, तरीही गृहिणी आज बचतीस प्राधान्य देतील.

वृषभ – (शुभ रंग – राखाडी)
आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अति स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. तुमची काही गुपिते उघड होतील.

मिथुन – (शुभ रंग – आकाशी)
आज पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तुत्वाचा ही प्रभाव राहील. भावंडांमध्ये मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे.

कर्क – (शुभ रंग – निळा)
अथक परिश्रमांच्या सहाय्यानेच आज प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने काही योग्य माणसे संपर्कात येतील. काही मनाजोगत्या घटना उत्साह वाढवतील.

सिंह – (शुभ रंग – चंदेरी)
आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. आज अतिआत्मविश्‍वास मात्र घातक ठरेल. इतरांस मदत करताना आपली ही शिल्लक तपासा.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – (शुभ रंग – पांढरा)
प्रतिष्ठितांच्या ओळखीतून काही तरी फायदा होईल. उपवरांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा असलेला दिवस सत्कारणी लावा.

तूळ – (शुभ रंग – सोनेरी)
व्यवसायातील प्रतिष्ठा सांभाळायची असेल तर उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल. उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कामाचे तासही वाढवावे लागतील. रिकामे वाद-विवाद टाळा.

वृश्चिक – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणे हिताचे राहील. कुणाला मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका, कारण त्याने नाती दुरावतील.

धनु – (शुभ रंग – भगवा)
आज कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल. वैवाहिक जीवनात जोडीदारास फार प्रश्न न विचारणे हिताचे राहील. नीतीबाह्य वर्तन टाळायला हवे. गाडी हळू चालवा.

मकर – (शुभ रंग – जांभळा)
व्यवसायात भागीदारांशी सलोखा राहील. गृहिणींना विविध जाहिराती भुरळ घालतील. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे फुगवे असतीलच. कुटुंबात सुसंवाद राहील.

कुंभ – (शुभ रंग – गुलाबी)
नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्‍नात लक्ष घालावे लागणार आहे. उच्चशिक्षितांना मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील.

मीन – (शुभ रंग – मोतीया)
तुमच्या कामातील उत्साह आज इतरांना प्रेरणा देईल. हौशी मंडळींना आज जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. एखाद्या मॉल मध्ये फेरफटका माराल. बिनधास्त खर्च कराल.

 

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.