सोमवार, सप्टेंबर 26, 2022

Today’s Horoscope 21 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 21 September 2022
बुधवार.
तारीख 21.09.2022
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष – इंदिरा एकादशी, एकादशी श्राद्ध
राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30
दिशा शूल- उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र- पुष्य 23.47 पर्यंत नंतर आश्लेषा.
चंद्र राशी – कर्क.
————————————–
मेष – शुभ रंग – हिरवा

कामाच्या व्यापात रखडलेली अनेक घरगुती कामे आज मार्गी लागतील. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागणार आहे. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साध साधणे गरजेचे आहे.

वृषभ- शुभ रंग- सोनेरी

कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. ऑफिसमधील तंग असलेले वातावरण दुपारनंतर निवळेल. आज संध्याकाळी सत्संगाकडे पावले आपोआपच वळतील.

मिथुन- शुभ रंग-राखाडी

आज केवळ भिडस्‍तपणापायी न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज फक्त आपल्या जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे.

कर्क-शुभ रंग-पांढरा

आज तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील फार काळजी करू नका परंतु वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आज वैवाहिक जीवनातले मतभेद संध्याकाळी निवळतील.

सिंह-शुभ रंग- निळा

दुकानदारांची थकीत उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल वैवाहिक जीवनात जुन्या स्मृती मनास आनंद देतील.

कन्या- शुभ रंग- डाळिंबी – Today’s Horoscope 21 September 2022

हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. गृहिणी आज घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

तूळ- शुभरंग- आकाशी

वास्तु व वाहन खरेदीचे व्यवहार आज टाळले तर बरं होईल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी अभ्यासांपेक्षा खेळातच जास्त रमतील.

वृश्चिक- शुभ रंग- मरून

आज तुम्ही गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे कराल.एखाद्या कामासाठी शेजारी धावून येतील. क्षुल्लक गैरसमजामुळे दुरावलेली नाती आज जवळ येतील.

धनु- शुभ रंग- स्ट्रॉबेरी

आज तुम्ही आपल्याच मर्जीप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होईल. कठोर बोलण्याने काही आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे कुणाला आज मोफत सल्ले वाटप करू नका.

मकर- शुभ रंग- पिस्ता

काही जणांना आज तातडीचे प्रवास घडू शकतात. घरात वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर शोधल्यास सापडेल.

कुंभ- शुभ रंग- मोरपंखी

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. तुमची आर्थिक बाजू आज भक्कम असल्याने थोडी अनावश्यक खरेदी ही कराल. लांबच्या प्रवासात बेसावध राहू नका.

मीन- शुभ रंग- भगवा

आज तुम्ही आळस झटकून कामाला लागल. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घेऊ शकता. हाती असलेला पैसा जपूनच वापरा. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका.

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

Ramdas Kadam : राज्यात फिरून दाखवाच, रामदास कदम यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक

spot_img
Latest news
Related news