Todays Horoscope 29 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार – बुधवार, दि. 29.06.2022 (Todays Horoscope 29 June 2022)

  • शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.
  • आज विशेष – सामान्य दिवस.
  • राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – आर्द्रा 22.08 पर्यंत, नंतर पुनर्वसु.
  • चंद्र राशी – मिथुन.

_________________________

आजचे राशी भविष्य – (Todays Horoscope 29 June 2022) 

मेष – (शुभ रंग – मोतिया)

आज तुमच्यासाठी संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग धावपळच जास्त होईल. भावाभावात सामंजस्य राहील. आज काही महत्त्वाचे फोन येतील.

वृषभ – (शुभ रंग – तांबडा)

कार्यक्षेत्रात मान सन्मान वाढेल. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. दैव आज तुमच्याच बाजूने आहे. आज सर्व कामे विनाव्यत्यय पार पडणार आहेत.

मिथुन – (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल. तुमचा उत्साह व कार्यक्षमताही वाढेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. आर्थिक सुबत्ता येईल.

कर्क – (शुभ रंग- क्रीम)

हट्टीपणा सोडा, मनाच्या लहरीपणास आवर गरजेचा आहे. अति महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून आपल्या तब्येतीकडे ही लक्ष द्यायला हवे. उधारी उसनवारी आज नको.

सिंह – (शुभ रंग – हिरवा)

काही अनुकूल घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. नवीन उद्योजकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतील. जुन्या गुंतवणुकीतून मनाजोगता लाभ होईल. रखडलेले उपक्रम सुरू करू शकाल.

कन्या – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल. वाढीव जबाबदाऱ्या मात्र टाळता येणार नाहीत. आप्तस्वकीय मध्ये काहीतरी वैचारिक मतभेद संभवतात.

तुळ – (शुभ रंग -आकाशी)

नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपले काम बिनचूक कसे होईल यावर लक्ष देणे हिताचे राहील. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये. नास्तिक ही देवाला एखादा नवस करतील.

वृश्चिक – (शुभ रंग – जांभळा)

काही मानापमानाच्या प्रसंगाना तोंड द्यावे लागेल. आज थोडी संयमाची कसोटी राहील. फास्ट ड्रायव्हिंग टाळा. आज फक्त आपला स्वार्थ बघा, परमार्थ परवडणारा नाही.

धनु – (शुभ रंग – निळा)

आज तुमची तब्येत जरी नरम असली तरी तुमच्या कामातील उत्साह दांडगा राहील. व्यवसायिकांची आवक उत्तम राहील. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

मकर – (शुभ रंग – चंदेरी)

आज दिवस जरी तितकासा अनुकूल नसला तरी तुमची काही येणी असतील तर ती वसूल होतील. मामा मावशी यांच्याकडून काही शुभवर्तमान कळेल.

कुंभ – (शुभ रंग -गुलाबी)

आज आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. काही फसव्या संधी येऊ शकतात. हातचे सोडून मृगजळामागे धावण्या पूर्वी पूर्ण विचार करावा. आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील.

मीन – (शुभ रंग- भगवा)
उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल. गृहिणींना शारीरिक थकवा जाणवेल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.
फोन – 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.