Todays Horoscope 29 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार रविवार, दि. 29.05.2022

  • शुभाशुभ विचार – वर्ज्य दिवस.
  • आज विशेष — सामान्य दिवस.
  • राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – कृतिका.
  • चंद्र राशी – 11.16 पर्यंत मेष नंतर  वृषभ.

_________________________

मेष – ( शुभ रंग- आकाशी)

आज केवळ गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य दिले तर कार्यक्षेत्रात वर्चस्व टिकवून ठेवता येईल. आज गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. आनंदी दिवस.

वृषभ- ( शुभ रंग- पांढरा)

व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. हौशी मंडळींना जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. उपवरांना स्थळे सांगून येतील. आज जोडीदारानं दिलेले सल्ले खूप मोलाचे असतील.

मिथुन – ( शुभ रंग -मोरपिशी )

जमाखर्चाचा तराजू काहीसा डळमळीत राहील. काही देणी चुकवावी लागणार आहेत. अनावश्यक खर्चावर लगाम गरजेचा आहे. काही जड दूरच्या प्रवासाचा आनंद घेणार आहेत.

कर्क ( शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करावे लागतील. उत्पादनांचा दर्जाही वाढवावा लागणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ मिळेल.

सिंह -(शुभ रंग – डाळिंबी)

नोकरदारांना साहेबांच्या मागेपुढे करावेच लागेल. अधिकारांचा वापर करताना भिडस्तपणा अजिबात बाळगू नका. मित्रांनी दिलेल्या आश्वासनांवर अवलंबून राहू नका.

कन्या – (शुभ रंग- सोनेरी)

शासकीय कामे रखडतील. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असेल. सत्संनाने  मानसिक बळ मिळेल. विदेश गमनाची इच्छा असणाऱ्यांना संधी चालून येतील.

तुळ – ( शुभ रंग- चंदेरी)

आज काही नकारात्मक विचार मनात येतील काही क्षुल्लक गोष्टींनी ही राग अनावर होईल. वाहन चालवत असाल तर डोके शांत ठेवा. व्यवसायात आपल्या मर्यादा ओळखूनच गुंतवणूक वाढवा.

वृश्चिक – (शुभ रंग – सोनेरी)

महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. अशावेळी अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्यायला कमीपणा वाटून घेऊ नका. आज तुम्ही जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

धनु- ( शुभ रंग- भगवा)

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधक नमते घेतील, आज तुम्हाला श्रमसाफल्याचे समाधान मिळू शकेल. काही विसरलेली येणी अनपेक्षितरीत्या वसूल होतील.

मकर – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कौटुंबिक स्तरावर आज काही मनासारख्या घटना घडणार आहेत. मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. घरासाठी काही शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल.

कुंभ- (शुभ रंग- क्रीम)

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असून आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊन अडकू नका.

मीन- ( शुभ रंग- मरून)

कौटुंबिक वाद असतील तर ते आज दुपारनंतर सुसंवादाने मिटू शकतील. आज काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील. महत्वाची मेल्स येतील. रिकामटेकड्या चर्चा वादास निमंत्रण देतील.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी. 
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.