Pune News : पुण्यात नव्या कोरोना व्हेरीयंटचे रुग्ण आढळले, BA.4 व्हेरियंटचे चार तर BA.5 व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळले

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील कोरोनाचे जवळपास सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. पण कोरोना रुग्णांची संख्या आता वाढताना दिसत आहे. त्यात आज राज्यात प्रथम कोरोनाच्या BA.4 आणि BA.5 व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याचं आरोग्य विभाग सतर्क झालं आहे. 

पुण्यातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरू असलेल्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार पुणे शहरात BA.4 व्हेरियंटचे चार तर BA.5 व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात आज आढळलेले बी ए. व्हेरियंटचे सर्व रुग्ण पुणे शहरातील आहे. यामध्ये चार पुरूषांचा आणि तीन महिलांचा समावेश आहे. सर्व रुग्णांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले असून यातील 9 वर्षाच्या लहान मुलाने लस घेतलेली नाही.  सर्व रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून सर्व रुग्ण घरगुती विलिगीकरणात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.