Today’s Horoscope 6 October 2022 : जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 6 October 2022
गुरुवार.
तारीख 06.10.2022 
शुभाशुभ विचार- 10 नंतर चांगला दिवस.
आज विशेष – पशांकुषा एकादशी.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.
दिशा शूल- दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र- धनिष्ठा 19.42 पर्यंत नंतर शततारका.
चंद्र राशी- मकर 08.28 पर्यंत नंतर कुंभ.
————————————–
मेष – शुभ रंग – मरून 
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या काही अपुऱ्या इच्छा पूर्ण होतील. वाहन वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल.
वृषभ – शुभ रंग – पांढरा  
उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. हाताखालचे लोक आदमीने वागतील. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल.
मिथुन – शुभ रंग- आकाशी (Today’s Horoscope 6 October 2022)
महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. वाहतुकीचे नियम मोडू नका, दंड भरावा लागेल. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. ज्येष्ठांचा अध्यात्मिकतेकडे ओढा राहील.
कर्क – शुभ रंग – निळा
विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होईल. आज जिवलग मित्र ही दगा देऊ शकतात. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले उचला. वाहन चालवताना काळजी घ्या
सिंह – शुभ रंग – भगवा
आज चैनी व विलासी वृत्ती बळावेल. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी मनसोक्त खर्च कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील.

कन्या – शुभ रंग – क्रीम
स्थावर शेतीवाडी संबंधित अपुरे व्यवहार मार्गे लागतील मुलांची अभ्यासात एकाग्रता दिसून येईल. प्रेम प्रकरणात मात्र फसवणूक संभवते. आज स्वतःच्याच प्रेमात पडणे हिताचे राहील.
तूळ – शुभ रंग- स्ट्रॉबेरी
आज काम कमी धावपळ जास्त होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत ठरेल. शेजाऱ्यांशी सुसंवाद राहील.
वृश्चिक – शुभ रंग- मोतिया
धंद्यातील उधारी वसूल होईल गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला अवगत असेल. कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल. कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या आनंदाने पुरावाल.
धनु – शुभ रंग – राखाडी
आज तुमचे मन थोडे चंचल राहील. अति उत्साहात चुकीचे निर्णय घेऊन बसाल. प्रवासात काही नवे हितसंबंध जमतील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.
मकर – शुभ रंग – पिस्ता
आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस अवश्य प्राधान्य द्या. क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. गोड बोलून आपले ध्येय साधून घ्या. आज स्पष्ट वक्तेपणास आवर घाला.
कुंभ – शुभ रंग – गुलाबी
आज तुमची तब्येत थोडीशी नरम राहील. क्षुल्लक गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. जशास तसे या धोरणाने वागा मोफत सल्लागार मंडळींना दोन हात दुर ठेवा.
मीन – शुभ रंग – क्रीम 
पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. घरात आज थोर मंडळंशी काही मतभेद होतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. थोडी भटकंती होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.