Today’s Horoscope 8 April 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

0

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – गुरुवार. 8 एप्रिल  2021

  • शुभाशुभ विचार –शुभ दिवस.
  • आज विशेष -चंपाषष्ठी, स्कन्द षष्ठी.
  • राहू काळ – संध्याकाळी 04.30 ते 06.00
  • दिशा शूल -पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – शततारका 21.01 पर्यंत नंतर पूर्वाभाद्रपदा.
  • चंद्र राशी – कुंभ.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- क्रीम)

आज दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. काही कारणाने दुरावलेले आप्तस्वकीय आज जवळ येतील. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस आहे. शुभ चींता.

वृषभ – ( शुभ रंग- पिस्ता )

नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. विरोधकांनाही तुमचे विचार पटतील. अधिकार गाजवू शकाल.

मिथुन – ( शुभ रंग- सोनेरी)

महत्त्वाचे निर्णय घेताना आज द्विधा मनस्थिती होणार आहे. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची मते विचारात घेणे गरजेचे आहे.

कर्क – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. वैवाहिक जीवनात संध्याकाळी शुल्लक मतभेद होणार आहेत पण त्यातून सामंजस्याने मार्ग काढता येईल. अति आक्रमकतेने नुकसान होईल.

सिंह – ( शुभ रंग- गुलाबी)

आज तुम्ही सहकुटुंब चैन व मनोरंजनास प्राधान्य द्याल. वैवाहिक जीवनात एकमत राहील. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा. विवाह जुळवण्या विषयी बोलणी आज उरकून घ्या.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – ( शुभ रंग- पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचे योग आहेत. ज्येष्ठ मंडळांनी प्रकृतीची पथ्ये पाळावीत. काही येणी असतील तर आज वसुली होतील.

तूळ – ( शुभ रंग – भगवा)

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरीत बदल करायचा असेल तर चांगल्या संधी चालून येणार आहेत. ब्युटी पार्लर्स व सौंदर्य प्रसाधने इत्यादी व्यवसाय तेजीत चालतील.

वृश्चिक – ( शुभ रंग- मोरपिशी)

आज धंद्यातील आवक-जावक सारखीच राहील. जोडीदाराकडून आज तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील.
कौटुंबिक वातावरण स्नेहपूर्ण राहील. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता होईल.

धनु – ( शुभ रंग- जांभळा)

आज कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी आवर्जून वेळ काढावा लागणार आहे. आज जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाईल. तरुण मंडळी जास्तीत जास्त व्हाट्सअप वर बिझी राहतील.

मकर – ( शुभ रंग – निळा)

अविश्रांत मेहनतीच्या जोरावर कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व सिद्ध कराल. मृदू वाणीने विरोधकांची मने जिंकाल. संध्याकाळी आवडत्या व्यक्तीच्या सहवासात वेळेचे भान विसराल.

कुंभ – ( शुभ रंग- आकाशी )

आज तुम्ही काहीसे बेफिकीरपणे वागाल. स्वतःचेच खरे करण्याकडे तुमचा कल राहील. आज थोडा संयम बाळगा. आवक पुरेशी असली तरीही बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे .

मीन  – ( शुभ रंग – सोनेरी )

पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज दिवसाच्या उत्तरार्धात काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेत. रात्रीच्या प्रवासात जागेच राहणे हिताचे राहील.

 

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment