Pimpri News : कोरोना कॉलर ट्यून बंद करा ; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना या संसर्गजन्य आजाराबद्दल जनजागृती आणि दक्षता घेण्याचे आवाहन करणारी कोरोना कॉलर ट्यून आता डोकेदुखीचा विषय चालली आहे. हि कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालयीन सचिव क्रांतिकुमार कडुलकर यांनी याबाबत असे म्हटले की, मार्च महिन्यापासून केंद्र सरकारने कोरोना जागृतीसाठी कॉलर ट्यून सुरु करण्याचे आदेश मोबाईल कंपन्यांना दिले, तेव्हापासून सुरू असलेली ही ट्युन मनस्ताप देणारी आणि चेष्टेचा विषय झाली आहे. सलग एक मिनिटं चालणाऱ्या या ट्यून मूळे अनेकांचा अमूल्य वेळ वाया जात आहे ते म्हणाले.

दरम्यान, हि कॉलर ट्यून कशी बंद करावी हा पेच लोकांसमोर आहे. लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी लक्ष घालून हि कॉलर ट्यून बंद करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठवावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.