Ravet News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक

पाच महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रावेत येथे मंगळवारी (दि. 9) दुपारी छापा टाकून पाच महिलांची सुटका करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.

स्पा सेंटरचा चालक व मालक अमोल दत्तात्रय नवले (वय 29, रा. चाकण), तसेच स्पा सेंटरचा मॅनेजर आकाश अनिल सोनवणे (वय 24, रा. थेरगाव, मूळ रा. औंढी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग समाधान सिसोदे यांनी या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील हर्पल यूनीसेक्स स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली. तर स्पा सेंटरचा चालक मालक नवले आणि मॅनेजर सोनवणे या दोघांना अटक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.