Moshi Crime News : डॉक्टरचे घर फोडून सात लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज – डॉक्‍टरच्या घराच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 9) दुपारी मोशी येथे उघडकीस आली.

डॉ. अमोल मोहनराव पाटील (वय 36, रा. साईरंग अपार्टमेंट, संतनगर, मोशी-प्रधिकरण) यांनी बुधवारी (दि. 9) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी आठ ते दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास फिर्यादी डॉ. अमोल यांचे घर बंद होते. त्यावेळी दोन अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे सेंट्रल लॉक कशाच्या तरी साह्याने उचकटून आत प्रवेश केला. घरातील सात लाख 15 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य घरफोडी करून चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.