Chakan Crime News : गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक ; दोन किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना चाकण पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन किलो 35 ग्रॅम वजनाचा 50 हजारांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 9) मध्यरात्री पावणे भोसे येथे अजय होजगे याच्या जनावरांच्या गोठ्यात करण्यात आली.

सुरज आसराज छाजेड (वय 25, रा. तुषार डावरे यांच्या खोलीत, ता. खेड), अजय बबन होजगे (वय 24, रा. भोसे हाजगे वस्ती, ता. खेड), कादर बादशहा इस्माईल शेख (वय 27, रा. बोधेगाव, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रदीप राळे तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गांजा विक्री करण्यासाठी आणला असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री पावणे एक वाजता आरोपी अजय होजगे याच्या जनावरांच्या गोठ्यात कारवाई करून पोलिसांनी 50 हजार रुपये दोन किलो 35 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक अमोल डेरे तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.