Chikhali News : भाजी मंडईतून घरी परताना महिलेचे 4 तोळ्याचे दोन गंठन हिसकावली

एमपीसी न्यूज – भाजी मंडईतून भाजी खरेदी करून घरी जात असताना महिलेचे 3 तोळे 5 ग्रॅम वजनाचे एक आणि 1 तोळा वजनाचे एक असे दोन गंठन हिसकावले. दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी ही चोरी केली. कोयना नगर येथे रविवारी (दि.20) ही घटना घडली.

चिखली पोलीस ठाण्यात याबाबत महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून दोन अनोळखी इसमांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कृष्णानगर भाजी मंडई येथून भाजी खरेदी करून पायी चालत घरी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 3 तोळे 5 ग्रॅम वजनाचे एक आणि 1 तोळा वजनाचे 90 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठन हिसकावले असे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.