Lonavla News : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वलवण फाट्यावर दुचाकी अपघात; 1 ठार 2 जखमी

एमपीसी न्यूज : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कैवल्याधाम पोलीस चौकीसमोरील वलवण फाटा येथे झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले आहे.

ऋषिकेश गावंडे (रा. अकोला) असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव असून सचिन गावंडे व मनोज (पुर्ण नाव समजू शकले नाही) हे दोघे जखमी झाले आहेत.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणावळ्याच्या दिशेने दोन दुचाकी येत होत्या. वलवण फाटा येथे एक बस बंद पडलेली असल्याने सर्व वाहने तीच्या बाजुने पुढे येत असताना गडबडलेले सदर दुचाकी चालक एकमेकांना धडकत पडले व घसरत जाऊन समोर येणार्‍या पिकअपला धडकले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभिर व एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.