Crime News : गॅरेज चालवणारेच निघाले दुचाकी चोर;डिमार्टच्या पार्किंगमधील गाड्या होत्या टार्गेट

एमपीसी न्यूज – एरवी गॅरज चालवणे व त्याला जोड म्हणून पुण्यातील डिमार्टच्या गर्दीच्या पार्किंगमधील दुचाकी चोरणे असा गोरख धंदा करणाऱ्या दोन अट्टल चोरांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.या कारवाईमध्ये 18 गुन्हे पोलिसांनी उघड झाले आहेत.

सागर अशोक चव्हाण (वय 27, रा. दत्तनगर), संदिप संपत आंधळे (वय 21 रा.कात्रज) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांचा आणखी एक साथीदार आकाश वसंत लोखंडे (वय 22 रा. वारजे माळवाडी) हा फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना माहीती मिळाली की, कर्वेनगर येथील डी मार्टच्या पार्किंगमधून दुचाकी चोरणारी व्यक्ती हा जांभुळवाडी येथे विघ्नहर्ता नावाचे गॅरेज चालवतो. पोलिसांनी वेशांतर करून परिसरात सापळा रचला.आरोपी हे दुकानाचे शटर उघडत असताना पोलिसांनी झडप घालून दोन आरोपींना अटक केली आहे.

Ganeshostav : श्रीमंत दगडुशेठ गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

त्यांच्याकडे अधिक तपास केला असता तिन्ही आरोपींवर वारजे माळवाडी, अलंकार, हवेली, हडपसर, वाकड, चतुःश्रुंगी, हिंजवडी, पिंपरी या परिसरातील डि मार्ट मॉलच्या गर्दीच्या पार्किंग मधील गाड्या ते चोरत असल्याचे त्यांनी कबुली दिली.त्यांच्याकडून पोलिसांनी 5 दुचाकी जप्त केल्या असून त्यांच्यावर दाखल असलेले 18 गुन्हे पोलिस तपासात उघड झाले आहेत. वारजे माळवाडी पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.