Devendra Bhuyar : उध्दव ठाकरे ‘बडव्यांमुळे’ झाले बदनाम – देवेंद्र भुयार

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे बंडखोर आमदार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर नाराज नाहीत. पण ठाकरे यांच्याभोवती असलेल्या बडव्यांवर ते नाराज आहेत.त्यामुळे आमचा विठल्ल बदनाम होत आहे, अशा शब्दात मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar)  यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

 

 

 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या बडव्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मातोश्री आजही पवित्र आहे. उध्दव ठाकरे यांच्या कार्यपध्दतीवर कोणी नाराज नाही, असेही भुयार यांनी स्पष्ट केले.

 

 

Warning to the Rebels : सामनातून बंडखोरांना दिला इशारा

 

प्रसारमाध्यमांशी बोलताना भुयार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाविषयी भाष्य केले.या बंडाला भुयार (Devendra Bhuyar) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याजवळ असलेल्या काही लोकांना जबाबदार धरले आहे.उध्दव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या दोन-चार लोकांमुळे ४३-४४ आमदार शिंदे यांच्याबरोबर गेले. मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क होत नाही, भेटीसाठी त्यांची वेळ मिळत नाही, हेच आमदारांच्या नाराजीचे कारण आहे.उध्दव ठाकरे यांच्या कार्यपध्दतीवर कोणी नाराज नाही.त्यांनी कोणाचे नुकसान केले नाही, असे भुयार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.