Pune News : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन 

एमपीसी न्यूज – पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे शुक्रवारी (दि.2) केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरती करत दर्शन घेतले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिंदे व फडणवीस यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष  प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, मराठा साम्राज्याच्या आणि देशाच्या प्रत्येक नागरिकांचा हा महत्वपूर्ण उत्सव आहे.दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे भव्य आणि सुंदर स्थान आहे. पंतप्रधानांच्या विचारधारेने भारत विश्वगुरू ही कल्पना पुढे घेऊन आम्ही जाऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.