Talegaon Dabhade : माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी उभारला कृतज्ञता निधी

एमपीसी न्यूज –  इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिर या शाळेतील सन 1979 – 80 च्या एसएससी बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी कृतज्ञता निधी उभारला.शाळेचे माजी विद्यार्थी व वडगाव मावळ पंचायत समितीचे माजी शिक्षण विस्ताराधिकारी कै.शांताराम ज्ञानोबा पिंगळे व पांडुरंग शंकर खेडकर यांच्या पुढाकाराने शाळेसाठी देणगी म्हणून 1 लाख 16 हजार 667 रुपये निधी जमा केला. त्या रकमेचा धनादेश विद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे, मुख्याध्यापक सुदाम वाळुंज यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

या शाळेचे माजी विद्यार्थी व वडगाव मावळ पंचायत समितीचे माजी शिक्षण विस्ताराधिकारी कै. शांताराम ज्ञानोबा पिंगळे व पांडुरंग शंकर खेडकर यांच्या पुढाकाराने शाळेसाठी देणगी म्हणून कृतज्ञता  निधी उभारण्यात आला. नुकतेच शांताराम पिंगळे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. परंतु त्यांच्या त्यावेळच्या वर्ग मित्रांमध्ये भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष साहेबराव आनंदराव काशीद, पांडुरंग शंकर खेडकर, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बाळासाहेब केदारी, दीपक मारुती राऊत, संभाजी बळीराम काळे  यांच्यासह तेवीस माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेसाठी भरीव मदत गोळा  केली. त्या रकमेचा धनादेश विद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे, मुख्याध्यापक सुदाम वाळुंज यांच्याकडे  आज सुपूर्त करण्यात आला.

यावेळी भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष साहेबराव काशीद,ॲड ज्ञानेश्वर केदारी,दीपक राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

1965 साली स्थापन झालेल्या या शाळेचे आज अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करत आहेत. शाळेने दिलेले संस्कार शाळेने दिलेली लावलेली शिस्त, त्यामुळे आज आम्ही विविध क्षेत्रात अत्यंत चांगल्या प्रकारचे कार्य करत आहोत. याचे सर्व श्रेय शाळेला जाते असे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

आज शाळेमध्ये पाचवी ते बारावीचे एकूण 1150 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेचे बदललेले रूप, शाळेतील वाढलेली विद्यार्थी संख्या, शाळेची शिस्त, शाळेची गुणवत्ता याबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,सर्व शिक्षक व सेवक यांचे विशेष कौतुक केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुदाम वाळुंज यांनी शाळेमध्ये असलेल्या सोयी सुविधा, शाळेच्या असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध सामाजिक संस्था, माजी विद्यार्थी,समाजातील दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्यामुळेच आज सुसज्ज शाळा उभी राहिली आहे असे विचार व्यक्त केले. यापुढेही अशीच मदत मिळत राहील असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला आणि उपस्थित सर्वांचे त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.