Unlock-2: रात्रीच्या संचारबंदीत एक तासाची सूट; नवीन वेळ रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत

Unlock-2: One hour discount on night curfew; New time from 10pm to 5am सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक आणि धार्मिक आयोजनावर बंदी असेल. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही बंदी असेल.

एमपीसी न्यूज- केंद्र सरकारने अनलॉक-2 साठी सोमवारी नवी नियमावली जारी केली आहे. त्याचा कालावधी 31 जुलैपर्यंत असेल. या नियमावलीनुसार, शाळा-महाविद्यालये आणि इतर शिक्षण संस्था 31 जुलैपर्यंत बंद राहतील. परंतु, ऑनलाइन अभ्यास आणि दूरस्थ शिक्षण सुरु राहिल. सरकार याला चालनाही देईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था 15 जुलैपासून सुरु होतील. त्याचबरोबर रात्रीच्या संचारबंदीच्या कालावधीत एका तासाची सूट देण्यात आली आहे. पूर्वी रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी होती. आता ही संचारबंदी रात्री 10 ते पहाटे 5 असेल.

देशातील मेट्रो सेवा, सिनेमा थिएटर्स, जिम, स्वीमिंग पूल, एंटरटेन पार्क, बार, ऑडिटोरियम 31 जुलैपर्यंत बंदच राहतील.


सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक आणि धार्मिक आयोजनावर बंदी असेल. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही बंदी असेल. परंतु, गृहमंत्रालयाकडून विशेष परवानगी मिळालेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.