Chinchwad News: बिर्ला हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांकडून अवास्तव बील आकारणी; बिल, उपचारपद्धतीची चौकशी करा – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज –  थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल प्रशासन कोरोना रुग्णांकडून वाढीव बिले घेत आहे. बील भरले नाही. तर, मृतदेह ताब्यात दिला जात नाही. याबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. कोरोना रुग्णांचा सर्वाधिक मृत्यूदर बिर्ला हॉस्पिटलचा असल्याचा आरोप करत   हॉस्पिटलची उपचार पद्धती, बिला संदर्भात चौकाशी करावी, अशी सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, महापालिकेने शहरातील शंभरहून अधिक रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचाराला परवानगी दिली आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठीचे दर राज्य सरकारने निश्चित करून दिले आहेत. असे असताना थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल प्रशासन कोरोना रुग्णांकडून वाढीव बिले घेत आहे.

याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल केल्यास रुग्णाच्या नातेवाईकांना भेटून न देणे, रुग्णांशी फोनवर बोलण्यास बंदी घालणे, रुग्णांची सद्यपरिस्थितीची माहिती लवकर दिली जात नाही. मात्र, पैसे भरायचे असल्यास त्वरित फोन केला जातो.

बील भरले नाही. तर, मृतदेह ताब्यात दिला जात नाही. असे अनेक प्रकार समोर आले आहेत. कोरोना रुग्णांचा सर्वाधिक मृत्यूदर बिर्ला हॉस्पिटलचा राहिला आहे. आतापर्यंत शेकडोच्या वर रुग्ण दगावले आहेत. बिर्ला हॉस्पिटल प्रशासनाच्या अरेरावी, मनमानी कारभाराच्या अनेक तक्रारी माझ्याकडे सातत्याने येत आहेत.

त्यामुळे हॉस्पिटलची उपचार पद्धती, बिला संदर्भात चौकाशी करावी. मृत्यू झालेल्या रुग्णांबाबतही चौकशी करावी. त्यांच्यावर कोणते उपचार केले होते, याची सखोल चौकशी करावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.