US On Tik Tok: ट्रम्प यांचा चीनला धक्का; टिकटॉकला 45 दिवसांचा अल्टिमेटम

Us Bans Dealings With Chinese Owners Of Tiktok And Wechat Donald Trump Signs Orders Banning Chinese Apps डोनाल्ड ट्रम्प हे चिनी व्हिडिओ अ‍ॅप टिकटॉकवर सातत्याने दबाव आणत होते.

एमपीसी न्यूज- चीनविरोधात सातत्याने आक्रमक धोरण अवलंबणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी अ‍ॅप टिकटॉक आणि वी चॅट बरोबरील व्यवहारावर निर्बंध घातले आहेत. या आदेशानुसार येत्या 45 दिवसांनंतर अमेरिकेच्या अधिकार क्षेत्रात बाइटडान्सबरोबर (टिकटॉक) कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराला निर्बंध घालण्यात आले आहेत.

ट्रम्प यांनी मायक्रोसॉफ्ट किंवा इतर कंपन्यांनी टिकटॉक खरेदी न केल्यास देशात टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंतची कालमर्यादा निश्चित केली आहे.


टिकटॉक, मायक्रोसॉफ्ट आणि वी चॅटच्या प्रमुखांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. तत्पूर्वी, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॅम्पिओ यांनी अमेरिका चीनच्या अ‍ॅपवर कारवाई करेल अशी शक्यता वर्तवली होती. त्यांनी टिकटॉक आणि वी चॅटचेही नाव घेतले होते.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प हे चिनी व्हिडिओ अ‍ॅप टिकटॉकवर सातत्याने दबाव आणत होते. त्यांनी टिकटॉकने आपला मालकी हक्क अमेरिकन कंपनीला विकण्यास सांगितले होते. यावर चीनने आक्षेप नोंदवत अमेरिकेवर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.