Vadgaon Maval : वारंगवाडीत जिल्हा परिषदेचे सदस्य बाबूराव वायकर यांच्या हस्ते अंगणवाडीचे भूमिपूजन, व्यायाम शाळा साहित्याचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य बाबूराव आप्पा वायकर यांच्या फंडातून वारंगवाडी येथील अंगणवाडीसाठी सुमारे 8 लाख 50 हजार रूपये आणि व्यायाम शाळा साहित्यसाठी 5 लाख 50 हजार रूपये मंजूर केले. याच नवीन अंगणवाडीचे भूमिपूजन आणि व्यायाम शाळा साहित्याचे उद्घाटन आज सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेचे सदस्य बाबूराव वायकर यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी वडगावचे मा.सरपंच तुकाराम ढोरे, माजी सरपंच विशाल वहिले,उद्योजक सतिश कलवडे,उद्योजक प्रफुल्ल शिंदे,साते ग्रा.सदस्य विठ्ठल मोहिते, दत्तात्रय वारिंगे,उद्योजक संजय वारिंगे,आंदरमावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष विक्रम कलवडे बबन मांडेकर,संदिप वारिंगे, प्रदीप कलवडे, गिरीष सावले, विवेक मोरे, दिपेश शिंदे, विनायक खोंडगे, ॠषीकेश वारिंगे, नरेश तुमकर, संभाजी नखाते,जालिंदर नखाते, महेंद्र बो-हाडे, किशोर वारिंगे, सुयश वारिंगे, अंगणवाडी ताई रंजना मोरे, मतदनिस कांताबाई खोंडगे, आशाताई कालेकर, तुमकर बाई, गणेश ढोरे, सुहास वायकर, शाळेतील मुले-मुली व ग्रामस्थ उपस्थित होते.

  • दरम्यान, मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबूराव आप्पा वायकर यांनी जिल्हा परिषद फंडातून अंगणवाडी व जिमचे साहित्य व भजन साहित्य भजनी मंडळाला दिल्याबद्दल सुदर्शन तरुण मंडळाच्या वतीने व वारंगवाडी ग्रामस्थांकडून त्यांचे आभार मानले.

दत्तात्रय वारिंगे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. विक्रम कलवडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.