Vadgaon Maval: राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलनाबाबत मावळ भाजपचे तहसीलदारांना दूध भेट देऊन निवेदन सादर

Vadgaon Maval: Maval BJP giving milk and submits statement regarding statewide milk collection stop agitation दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आज दूध उत्पादक आर्थिक संकटात आहे.

एमपीसी न्यूज- दूध दर वाढवून मिळावा यासाठी मावळ भाजपने तहसीलदार यांनी निवेदन दिले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी विविध संकटांचा सामना करत असतानाच लॉकडाऊन काळात शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्याने दुधाची मागणी घटली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना अत्यल्प दराने दूध विक्री करावी लागत आहे. परंतु, याच परीस्थितीत सर्वसामान्य लोकांना मिळणाऱ्या दूध दरात कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. दूध विक्री दर पूर्वीइतकाच कायम आहे. दूध दर वाढवून मिळावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना कमी दर का? महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांकडून रास्त दराने दूध खरेदी करण्याच्या केलेल्या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आज दूध उत्पादक आर्थिक संकटात आहे.

गायीच्या दुधाला प्रति लीटर १० रुपये अनुदान, दूध भुकटीकरिता प्रतिकिलो ५० रुपये अनुदान, शासनाकडून ३० रुपये प्रतिलीटर दराने दुधाची खरेदी या मागण्यांकरिता १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी मावळ तालुका भाजपच्या वतीने तहसीलदार यांना गायीचे दूध भेट देऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, किरण राक्षे, सुनील चव्हाण, सुभाष धामणकर, जालिंदर धामणकर, शेखर दळवी, सचिन येवले, नामदेव वारिंगे, ज्ञानेश्वर गुंड, मच्छिंद्र केदारी, बाळासाहेब गाडे, बाळासाहेब धामणकर, सुभाष तुपे, मनोहर तुपे, नारायण बोडके, अनंता वर्वे, शांताराम दरेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.