Vadgaon Maval: मावळ तालुका राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल महिला अध्यक्षपदी ज्योती आंबेकर

एमपीसी न्युज : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय सेल मावळ महिला तालुकाध्यक्षपदी टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या ज्योती दिलीप आंबेकर यांची निवड करण्यात आली. (Vadgaon Maval) आंबेकर या मावळ तालुका राष्ट्रवादी महिला संघटक म्हणून कार्यरत आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय सेल मावळ तालुका महिला अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र आज (दि 01) रोजी आमदार सुनिल शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गणेश खांडगे, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष विकि लोखंडे यांच्या हस्ते ज्योतीताई आंबेकर यांना देण्यात आले.

 

RTO action: अवैध बाईक टॅक्सी सेवेविरुद्ध कठोर कारवाईचा आरटीओचा इशारा

 

यावेळी उपस्थित, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे, तालुका वरीष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, मावळ तालुका खादीग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, युवक अध्यक्ष किशोर सातकर, संदीप आंद्रे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे,ज्येष्ठ नेते विलास बडेकर,(Vadgaon Maval) चंद्रकांत दाभाडे,अतुल राऊत,संध्याताई थोरात, चंद्रजित वाघमारे, राज खांडभोर, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.