Vadgaon Maval: मावळात आज नव्या रुग्णांची संख्या घटली; दिवसभरात 14 रुग्ण पॉझिटिव्ह

Vadgaon Maval: The number of new patients in Maval dropped today; 14 patients tested positive during the day दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णसंख्येच्या तुलनेत आज नवीन रुग्णांची संख्या निम्म्याने घटलेली दिसते.

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यात आज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटली असून दिवसभरात 14 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये तळेगाव, लोणावळा, सोमाटणे (काकडे वस्ती), इंदोरी,वडगाव येथील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

वडगाव व काकडे वस्ती (सोमाटणे) येथे प्रत्येकी 1 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर इंदोरी येथे 2, तळेगाव दाभाडे येथे 7 आणि लोणावळा येथे 3 असे एकूण 14 रुग्ण आज दिवसभरात पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णसंख्येच्या तुलनेत आज नवीन रुग्णांची संख्या निम्म्याने घटलेली दिसते. आज अखेर 7 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

तळेगाव दाभाडे येथील प्रभाग क्र 11, शनिवार पेठ मधील 44 वर्षीय महिला हॉस्पिटल कर्मचारी, प्रभाग क्र 2 प्रभाग मस्करनीस कॉलनीतील 42 वर्षीय व्यक्ती, प्रभाग क्र 8 जव्हेरी कॉलनीतील 45 वर्षीय व्यक्ती व 16 वर्षीय मुलगा, प्रभाग क्र 10 साने आळी येथील 30 वर्षीय व्यक्ती, प्रभाग 6 निसर्ग सोसायटी मधील 27 वर्षीय व्यक्ती, प्रभाग क्र 5 काळोखेवाडी अंबिका सॉ मिल मागील 35 वर्षीय व्यक्ती अशा 7 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाझिटिव्ह आला आहे.

आजअखेर तालुक्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या 350 झाली असून यापैकी नऊ जणांचा मृत्यू तर 155 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 186 असून यापैकी 124 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 62 जणांवर होम क्वारंटाईन करून उपचार सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी गुणेश बागडे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील आजपर्यंत आढळलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 106 असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 56 जण उपचार घेत आहेत. पैकी 31 जण गृहविलगीकरणात आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.