Vadgaon Maval : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतराव वहिले यांचे निधन

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त अधिकारी श्री वसंतराव मारूती वहिले (वय 66) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, मुलगी, दोन भाऊ, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

शिवराज ग्रुपचे अध्यक्ष तुषार वहिले व पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस व वडगावचे माजी उपसरपंच विशाल वहिले यांचे वडील तर वडगाव नगरपंचायतीच्या नगरसेविका पूजा वहिले यांचे ते सासरे होत.

त्यांची अंत्ययात्रा आज, बुधवारी सकाळी दहा वाजता खंडोबा चौक वडगाव येथून निघून सकाळी १० वाजता वडगाव मावळ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.