Alandi News : केळगाव मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन, उदघाटन समारंभ

एमपीसी न्यूज :  केळगाव मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन समारंभ पार पडला. मा.सदस्य पुणे जिल्हा परिषद तसेच खेड तालुका भाजपा अध्यक्ष (Alandi News) अतुलभाऊ देशमुख, पंडित गोडसे व ह भ प प्रवीण महाराज शेंडकर यांच्या हस्ते भूमिपूजन व उदघाटन समारंभ संपन्न झाला.

केळगाव मधील हनुमानवाडीतील विविध विकास कार्यक्रमांतर्गत हनुमानवाडी ते आळंदी मुख्य ड्रेनेज लाईनचे उदघाटन समारंभ,हनुमानवाडी ठाकर वस्ती आर ओ प्लांट उदघाटन समारंभ,छत्रपती श्री.संभाजी महाराज पार्क, ड्रेनेज लाईन भूमिपूजन (हनुमानवाडी),वक्रतुंड कॉलनी सिमेंट कॉंक्रिट रस्ता भूमिपूजन (हनुमानवाडी),आळंदी केळगाव उभा रस्ता ड्रेनेज लाईन भूमिपूजन समारंभ,दुर्गा माता कॉलनी सिमेंट कॉंक्रीट रस्ता भूमिपूजन समारंभ (केळगाव),जिल्हा परिषद शाळा हनुमान वाडी आणि टॉयलेट बाथरूम उदघाटन समारंभ,चिरुका वस्ती ड्रेनेज लाईन भूमिपूजन समारंभ (केळगाव),दलित वस्ती ड्रेनेज लाईन उदघाटन समारंभ (केळगाव),ज़िल्हा परिषद शाळा केळगाव कॅम्पुटर रूम, वाचनालय अश्या गावातील इ. विविध विकास कामाचे भूमिपूजन व उदघाटन समारंभ रविवार 26 फेब्रुवारी रोजी,केळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.

Maharashtra : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार

या कार्यक्रमाचा मा.सदस्य पुणे जिल्हा परिषद तसेच खेड तालुका भाजपा अध्यक्ष अतुलभाऊ  देशमुख,पंडित गोडसे व ह भ प  प्रवीण महाराज शेंडकर यांच्या हस्ते भूमिपूजन व उदघाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी केळगाव विद्यमान ग्रामपंचायत सरपंच गुफांबाई ठाकर,किरण  मुंगसे,(Alandi News) उपसरपंच अक्षय  मुंगसे, रुपालीताई मुंगसे, अमोल वीरकर, चेतन बर्गे सोसायटी चेअरमन शिवाजीराव मुंगसे, सामाजिक कार्यकर्ते राजाराम मुंगसे, चंद्रकांत मुंगसे सुधीर वाहिले, नामदेवराव जगताप, दत्तात्रय लायगुडे,ज्ञानेश्वर मुंगसे, ह भ प कैलास महाराज ढगे, सोपान महाराज निकम, नामदेव भांडवलकर, पांडुरंग मुंगसे, शिवाजी मुंगसे, मनोज मुंगसे इ.मान्यवर उपस्थित होते.याबाबत माहिती किरण मुंगसे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.