Pune News : अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा भंग, ॲड. प्रवीण चव्हाण यांची पोलिसात तक्रार

एमपीसी न्यूज –  पुण्यातील वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात स्पाय कॅमेरा बसवून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी अखेर तेजस मोरे या तरुणाविरोधात अखेर तक्रार करण्यात आली आहे. प्रवीण चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा भंग झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना हा पेन ड्राईव्ह तेजस मोरे यांनीच पुरवला असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

स्वतः प्रवीण चव्हाण यांनीच तक्रार दिल्याने पोलीस आता तेजस मोरेचा शोध घेतात का हे पाहावे लागेल. प्रवीण चव्हाण यांनी जळगाव मधील तेजस मोरे या तरुणाने स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा केला होता तसेच या प्रकरणात एक माजी पत्रकार आणि एका पोलिस कॉन्स्टेबलचाही सहभाग असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता. त्यांची नावे ही लवकरच समोर येतील असा दावाही त्यांनी केलाय.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाला आता एक आठवड्याचा कालावधी झाला आहे. त्यानंतर आता प्रवीण चव्हाण यांनी पोलिसात धाव घेतली आहे. गोपनीयतेचा भंग आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचा आरोप केला आहे, त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांची भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.