Pimpri News : कष्टकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.श्रीपाल सबनीस यांची निवड

एमपीसी न्यूज – कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या वतीने कष्टकरी कामगारांचे प्रश्न व चळवळीला साहित्याची जोड देऊन प्रबोधन व्हावे यासाठी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राज्यव्यापी कष्टकरी कामगार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार कवी पद्यश्री नारायण सुर्वे यांच्या नावाने होणारे हे महाराष्ट्रातील पहिले साहित्य संमेलन असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी संयोजन समितीने एकमुखाने विचारवंत, साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांची निवड केली आहे.

कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, प्रमुख निमंत्रक पुरुषोत्तम सदाफुले , समिती सदस्य चंद्रकांत कुंभार ,समन्वयक सुरेश कंक यांनी पुणे येथे सबनीस त्यांना पद्यश्री नारायण सुर्वे कष्टकरी साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले.

यावेळी या साहित्य संमेलनाचे प्रमुख निमंत्रक पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार साहित्यिकांच्या जडणघडणीत नारायण सुर्वे सर यांचे बहुमूल्य योगदान आहे. श्रमिक कामगारांच्या साहित्याला न्याय मिळाला पाहिजे. श्रमिकांचे साहित्य लोकाभिमुख झाले पाहिजे म्हणूनच सुर्वे सर यांच्या नावे एकदिवसीय साहित्य संमेलन कष्टकरी संघर्ष महासंघाचे माध्यमातून प्रतिवर्षी घेण्यात येईल.’

काशिनाथ नखाते म्हणाले की, कष्टकरी कामगार यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी साहित्य रूपातून जोड देऊन त्यांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचा हा एक साहित्य संमेलनाचा प्रयत्न आहे. या प्रसंगी राज्यातील कामगार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.