Wakad crime News : प्रेयसीच्या मुलाला प्रियकराने फुस लावून पळवले

एमपीसी न्यूज – भांडण झाल्यानंतर प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या मुलाला फूस लावून पळवून नेले. ही घटना बुधवारी (दि. 24) रात्री थेरगाव येथे घडली.

मंगेश आकाराम यादव (वय 31, रा. नवी सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याबाबत 30 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगेश आणि फिर्यादी महिला यांचे खूप वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलासमोर त्यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. याबाबत फिर्यादी यांनी 21 जानेवारी रोजी वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

_MPC_DIR_MPU_II

तो गुन्हा मागे घेण्याची तसेच फिर्यादी यांनी आरोपी सोबत पूर्वीप्रमाणे एकत्र राहण्याची मागणी केली. गुन्हा मागे घेऊन ‘एकत्र राहिली नाही तर माझे जीवन संपवून टाकीन’ अशी धमकी देऊन त्याने त्याच्या घरी स्वतःचा हात जखमी करून घेतला.

त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेच्या मुलाला काळेवाडी फाटा येथे बोलावून घेतले. मुलाला औषधोपचारासाठी घेऊन जातो, असे सांगून पळवून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.