Wakad : मोकळ्या जागेत टॉवर टाकून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला पाच लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – मोकळ्या जागेत टॉवर टाकून देण्याचे अमिष दाखवून त्यासाठी ज्येष्ठ नागरिकाकडून सुमारे 5 लाख 19 हजार 50 रुपये घेतले. पैसे घेऊन टॉवर टाकून न देता अज्ञाताने ज्येष्ठ नागरिकाला गंडा घातल्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तम शंकर ओगले (वय 61, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उत्तम यांची आळंदी येथे मोकळी जागा आहे. त्या जागेत टॉवर सुरु करण्याच्या बहाण्याने अनोळखी इसमांनी 8607996878, 8607679694 या क्रमांकावरून संपर्क केला.

टॉवर बसवण्यासाठी फोनवरील इसमांनी उत्तम यांच्याकडून सुमारे 5 लाख 19 हजार 50 रुपये घेतले. पैसे घेऊन टॉवर न बसवता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.