Wakad : किरकोळ कारणावरुन विवाहितेचा छळ; पतीसह सासऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मुलगा मनोरुग्ण असल्याची माहिती न देता लग्न जमवले. लग्नानंतर पतीने आणि सासरच्या मंडळींनी विवाहितेला वारंवार मारहाण करून क्रूरतेची वागणूक दिली. ही घटना 15 मे ते 23 सप्टेंबर 2019 या कालावधीत घडली.

याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती हरीश सतीश पुरुस्वानी (वय २७) आणि सासरे सतीश रामचंद पुरुस्वानी (वय ५२, दोघे रा. सिंधी कॉलनी, उरळी कांचन) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आरोपी हरीश याच्याशी 15 मे 2019 रोजी लग्न झाले. लग्न जमवताना मुलाच्या घरच्यांनी तो मनोरुग्ण असल्याची माहिती दिली नाही. लग्नानंतर पतीने व सास-यांनी विवाहितेला वारंवार मारहाण केली. तसेच शिवीगाळ करुन क्रूरतेची वागणूक दिली. याप्रकरणी महिलेने पोलिसांत धाव घेत गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.