Wakad: वाहनचालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एका वाहनचालकाला तिघांनी हाताने मारहाण केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता भुमकर चौकात घडली.

याबाबत तानाजी जयवंत घोलप (वय 25, रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी समाधान लांडगे आणि त्याच्या दोन साथीदारांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • फिर्यादीला आरोपींनी सोमवारी सकाळी भूमकर चौकात हाताने मारहाण केली. आरोपींच्या तावडीतून सुटून फिर्यादी काळा खडक कॉर्नर येथे आले. तेथेही आलेल्या आरोपींनी पुन्हा त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.