Chakan Crime News : बदली चालकाला चालविण्यासाठी दिलेला ट्रक घेऊन चालक फरार

एमपीसी न्यूज – बदली चालकाला चालविण्यासाठी दिलेला ट्रक घेऊन चालक फरार झाला. 01 मार्च 2022 रोजी म्हाळुंगे, खेड येथे ही घटना घडली.

भारत चामचंद्र सपकाळ (वय 42, रा. वडगाव शेरी, मुळगाव करमाळा, सोलापूर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून, कोमल उर्फ उत्तमसिंह गुलाबसिंह (वय 33, रा. जबलपुर, मध्यप्रदेश) याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 406 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भारत यांनी आरोपी उत्तमसिंह याच्यावर विश्वास ठेऊन त्याला बदली चालक म्हणून (एमएच 12 डीजी 0628) हा ट्रक चालविण्यासाठी दिला. 01 मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास म्हाळुंगे येथे उत्तमसिंह याच्या ताब्यात ट्रक दिला. आरोपी ट्रक घेऊन फरार झाला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.