Wakad : भरदिवसा दुकानातून मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज – भरदिवसा दुकानातून अज्ञात चोरट्याने मोबाईल पळवून नेला. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास जय मल्हारनगर, थेरगाव येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

उमेश सीताराम ढमाले (वय 41, रा. जय मल्हारनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश फोटोग्राफर आहेत. त्यांचे थेरगाव कॉलनी क्रमांक पाच येथील जय मल्हारनगर येथे दुकान आहे. 27 नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुकानातून दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास एक हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा जिओ कंपनीचा मोबाईल पळवून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.