Pimpri: शास्तीकर माफी, पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिवेशनात मांडणार; आमदार लक्ष्मण जगताप यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध निवासी बांधकामांचा शास्तीकर पूर्णतः माफ करावा. पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी राज्य स्तरावर निर्णय होणे आवश्यकता आहे. त्यासाठी दोन्ही प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार आहे, अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

वाढत्या लोकसंख्येमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या आणखी गंभीर होण्यापूर्वीच शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी आता राज्य शासनाच्या स्तरावरील निर्णय गतीने होण्याची आवश्यकता आहे. तसेच अनधिकृत निवासी बांधकामांचा शास्तीकर पूर्णतः माफ करण्याची शहरातील नागरिकांची मागणीही राज्य शासनाने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.

त्यासाठी हे दोन्ही प्रश्न विधीमंडळाच्या पटलावर आणणार आहे. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवडचा पाण्याचा प्रश्न आणि अनधिकृत निवासी बांधकामांचा शास्तीकर पूर्णतः माफ करण्यासंदर्भात लक्षवेधी मांडली असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.