Warje : महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करण्याऱ्या तरुणास अटक

एमपीसी न्यूज- नियमभंग करून महिला वाहतूक पोलीस हवालदारास धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे
ही घटना शुक्रवारी ( दि. 4) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास वारजे माळवाडी येथील आंबेडकर चौकामध्ये घडली.

अवधुत सुनील देडगे (वय 22, रा.आल्हाट चौक, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वारजे वाहतूक विभागाच्या महिला पोलीस हवालदार एम.डी.लोंढे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस हवालदार एम.डी.लोंढे या वारजे येथील आंबेडकर चौकामध्ये वाहतूक नियमनाचे काम करत होत्या. दरम्यान अवधूत देडगे या तरुणाने वाहतूक नियमाचे उल्लंघन केले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला थांबवून त्याला त्याची ऍक्टिव्ह रस्त्याचा बाजूला घेण्यास सांगितली आणि त्याच्याजवळ लायसन्स मागितले. त्यामुळे अवधूतने लोंढे यांना अपशब्द बोलून त्यांना धक्काबुक्की केली.

पुढील तपास वारजे पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.