Bhosari: जेवताना तरुणावर कोयत्याने वार, भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या आई-वडिलांनाही मारहाण

While eating the young man was stabbed with a scythe and parents also beaten in kasarwadi

एमपीसी न्यूज- जुन्या भांडणाच्या कारणावरून सात जणांच्या टोळक्याने जेवण करत असताना एका तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या जखमी तरुणाच्या आई, वडिलांना आणि भावाला देखील मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.29) दुपारी कासारवाडी येथील हिराबाई झोपडपट्टी येथे घडली.

कृष्‍णा गंगाराम जमादार (वय 22, रा. हिराबाई झोपडपट्टी, कासारवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अशपाक शेख, आलीम, शाहरुख (सर्व रा. हिराबाई झोपडपट्टी कासारवाडी), पापा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याचे तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा आणि आरोपी यांचे गुरुवारी (दि. 28) किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या कारणाचा राग मनात धरून आरोपी शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कृष्णा यांच्या घरी आले.

त्यावेळी कृष्णा जेवण करत होते. आरोपींनी जेवण करत असताना कृष्णा यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर कृष्णा यांना घराच्या बाहेर ओढून नेत कोयत्याने आणि लोखंडी रॉडने त्यांच्या मानेवर व पाठीवर मारहाण केली.

यात कृष्णा गंभीर जखमी झाले. ही भांडणे सोडविण्यासाठी कृष्णा यांचे आई-वडील आणि भाऊ आले. आरोपींनी कृष्णा यांच्या आई, वडील आणि भावाला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like