Ramdas Athavale : आरपीआयचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी – रामदास आठवले

एमपीसी न्यूज – शिवसैनिकांची दादागिरी खपवून घेणार नाही.शिंदेंना काही झले तर माझ्या पक्षाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत, असे स्पष्ट करीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale)  यांनी शिंदे यांच्या भूमिकेला समर्थन दर्शविले आहे.

 

रामदास आठवले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती आठवले यांनी प्रसारमाध्यमांना दिली. चर्चेत एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांच्यातील वाद हा अंतर्गत आहे. त्यांच्या पक्षातील ही वैयक्तिक बाब असून भाजपचा त्याचाय्शी काहीही संबंध नाही, असे फडणवीस यांनी सांगितल्याचे आठवले यांनी सांगितले.

 

उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे स्वत: त्यांच्यातील वाद मिटवतील, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही वाट पाहत आहोत, असे फडणवीस यांनी म्हंटल्याचे आठवले  (Ramdas Athavale) यांनी स्पष्ट केले.विधानसभेचे आमदार हे शिंदे यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे हे सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे सरकार कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही.पक्षातून काढून टाकणे ठिक आहे पण आमदारकी रद्द करण्याची मागणी चुकीची आहे. गेलेले आमदार तुमच्याकडे परतण्याची शक्यता कमी आहे.

 

MLA Tanaji Sawant : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली पुण्यातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड

 

एकनाथ शिंदे यांची सुरक्षितता काढून टाकण्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, शिवसेनेत गुंडगिरी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेची दादागिरी खपवून घेणार नाही. शिंदे यांना काही झाल तर माझा संपुर्ण पक्ष शिंदे यांच्या सोबत असेल, असेही आठवले  (Ramdas Athavale) यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.