World Update: कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17 लाखांवर, बळींचा आकडा 1 लाख 2 हजार 684

अमेरिकेत पाच लाख जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधित मृतांच्या संख्येने काल (शुक्रवार) रात्री एक लाखांचा टप्पा ओलांडल्याने अनेकांच्या छातीत धडकी भरली आहे. काल (शुक्रवार) एका दिवसात 94 हजार 625 ने वाढल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 17 लाखांचा टप्पा जवळजवळ गाठला आहे. आज (शनिवारी) सकाळपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 99 हजार 631 इतकी झाली आहे. मृतांचा आकडा 6 हजार 971 वाढून एक लाख 02 हजार 684 झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 76 हजार 184 इतकी झाली, ही बाब थोडा दिलासा देणारी आहे. जगभरात अजून 12 लाख 19 हजार 967 इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 49 हजार 831 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 5,02,876 (+33,752), मृत 18,747 (+2,035)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 1,58,273 (+5,051), मृत 16,081 (+634)
  3. इटली – कोरोनाबाधित 1,47,577 (+3,951), मृत 18,849 (+570)
  4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,24,869 (+7,120), मृत 13,197 (+987)
  5. जर्मनी – कोरोनाबाधित 1,22,171 (+3,936), मृत 2,736 (+129)
  6. चीन – कोरोनाबाधित  81,907 (+42), मृत 3,336 (+1)
  7. यू. के. – कोरोनाबाधित 73,758 (+8,681), मृत 8,958 (+980)
  8. इराण – कोरोनाबाधित 68,192 (+1,972), मृत 4,232 (+122)
  9. टर्की – कोरोनाबाधित 47,029 (+4,747), मृत 1,006 (+98)
  10. बेल्जियम – कोरोनाबाधित 26,667 (+1,684), मृत 3,019 (+496)
  11. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 24,551 (+500), मृत 1,002 (+54)
  12. नेदरलँड – कोरोनाबाधित 23,097 (+1,335) , मृत 2,511 (+115)
  13. कॅनडा – कोरोनाबाधित 22,148 (+1,383), मृत 569 (+60) 
  14. ब्राझील – कोरोनाबाधित 19,789 (+1,644), मृत 1,068 (+114)
  15. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 15,472 (+1,516) , मृत 435 (+26)
  16. ऑस्ट्रीया – कोरोनाबाधित 13,560 (+316), मृत 319 (+24)
  17. रशिया – कोरोनाबाधित 11,917 (+1,786), मृत 94(+18)
  18. दक्षिण कोरिया – कोरोनाबाधित 10,450 (+27), मृत 208 (+4)
  19. इस्राईल – कोरोनाबाधित 10,408 (+440) , मृत 95 (+9)
  20.  स्वीडन – कोरोनाबाधित 9,685 (+544) , मृत 870 (+77)
  21. आयर्लंडकोरोनाबाधित 8,089 (+1,515) , मृत 287 (+24) 
  22. भारत – कोरोनाबाधित 7,600 (+875) , मृत 249 (+22)

आकडेवारीत अन्य देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची आकडेवारी कमी दिसत असली तरी प्रगत राष्ट्रांनी कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविल्यामुळे त्यांच्याकडील आकडे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्या मानाने भारताची कोरोना चाचण्यांची क्षमता खूपच कमी आहे. भारतातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढेल तसतशी ही आकडेवारीही वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.