World Update: जगात एका दिवसात 1 लाख 5 हजार नव्या रुग्णांची विक्रमी भर, मृतांच्या संख्येत मात्र घट

कोरोनामुक्त रुग्णांची संख्या आठ लाखांच्या पुढे,मृत्यूदरात घट आणि बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारीत वाढ

एमपीसी न्यूज – जगात काल एका दिवसात तब्बल एक लाख पाच हजार 616 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे. एका दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचा हा आतापर्यंतचा विक्रम आहे. रुग्णांची संख्या वाढली असली तरी सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित मृतांची संख्या मात्र घसरली आहे, ही दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल. जगातील कोरोनाचा मृत्यूदर थोडा घसरून 6.97 इतका झाला आहे तर कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची टक्केवारी वाढून 28.33 टक्के झाली आहे. हा बदल आशादायक आहे.

जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 28,30,289 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाख 97 हजार 263 (6.97 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 8 लाख 01 हजार 916 (28.33 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 18 लाख 31 हजार 110 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 17 लाख 72 हजार 586 (97 टक्के) रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 58 हजार 524 (3 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. 

मागील पाच दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

20 एप्रिल – नवे रुग्ण 73 हजार 931     दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 366

21 एप्रिल – नवे रुग्ण 75 हजार 254     दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 941

22 एप्रिल – नवे रुग्ण 79 हजार 959     दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 607

23 एप्रिल – नवे रुग्ण 85 हजार 434     दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 618

23 एप्रिल – नवे रुग्ण 1 लाख 05 हजार 616  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 174

अमेरिकेत गुरुवारी 2 हजार 342 कोरोनाबाधितांचा काल मृत्यू झाला होता. काल त्यात घट होऊन दिवसभरात 1 हजार 951 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. अमेरिकेतील कोरोना मृतांचा आकडा 52 हजारांच्या पुढे गेला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांचे संख्येने काल नऊ लाखांचा टप्पा ओलांडला. ब्रिटनमध्ये काल दिवसभरात 768 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ब्राझील कोरोनाबाधितांचा 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. इक्वाडोरमध्ये काल एका दिवसात 11,536 नवे कोरोना रुग्ण सापडल्याने या देशाचे नाव एकदम टॉप ट्वेटी देशांच्या यादीत 18 व्या क्रमांकावर पोहचले आहे. आयर्लंडमध्ये कोरोना बळींनी एक हजारचा टप्पा पार केला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 9,25,038 (+38,764), मृत 52,185 (+1,951)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 2,19,764 (+6,740), मृत 22,524 (+367)
  3. इटली – कोरोनाबाधित 1,92,994 (+3,021), मृत 25,969 (+420)
  4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,59,828 (+1,645), मृत 22,245 (+389)
  5. जर्मनी – कोरोनाबाधित 154,999 (+1,870), मृत 5,760 (+185)
  6. यू. के. – कोरोनाबाधित 143,464 (+5,386), मृत 19,506 (+768)
  7. टर्की – कोरोनाबाधित 1,04,912 (+3,122), मृत 2,600 (+109)
  8. इराण – कोरोनाबाधित 88,194 (+1,168), मृत 5,574 (+93)
  9. चीन – कोरोनाबाधित 82,804 (+6), मृत 4,632 (+0)
  10. रशिया – कोरोनाबाधित 68,622 (+5,849), मृत 615 (+60)
  11. ब्राझील – कोरोनाबाधित 52,995 (+3,503), मृत 3,670 (+357)
  12. बेल्जियम – कोरोनाबाधित 44,293 (+1,496), मृत 6,679 (+189)
  13. कॅनडा – कोरोनाबाधित 43,888 (+1,778), मृत 2,302 (+155) 
  14. नेदरलँड – कोरोनाबाधित 36,535 (+806), मृत 4,289 (+112)
  15. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 28,677 (+181), मृत 1,589 (+40)
  16. भारत – कोरोनाबाधित 24,447 (+1,408) , मृत 780 (+59)
  17. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 22,797 (+444), मृत 854 (+34)
  18. इक्वाडोर – कोरोनाबाधित 22,797 (+11,536), मृत 576 (+16)
  19. पेरू –  कोरोनाबाधित 21,648 (+734) , मृत 634 (+62)   
  20. आयर्लंडकोरोनाबाधित 18,184 (+577) , मृत 1,014 (+220) 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.