XI CET : अकरावी प्रवेशाच्या सीईटी अर्जात आजपासून दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध

एमपीसी न्यूज – अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार असून त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अर्जात चुका होत असल्याने त्या दुरुस्त करण्याबाबत पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार आज (शनिवारी, दि. 31) सायंकाळी पाच वाजल्यापासून अर्जात दुरुस्तीचा (edit option) पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार 31जुलै सायंकाळी पाच वाजल्यापासून 02 ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.

विद्यार्थ्यांना अर्जात ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, परीक्षेचे माध्यम, पत्ता, परीक्षा केंद्र तसेच sebc व ews प्रवर्गाबाबत माहिती संपादीत करता येणार आहे.

दरम्यान, सीईटी परिक्षेसाठी मंडळाने 20 जुलै रोजी अर्ज प्रक्रिया सुरू केली ती 21 जुलै रोजी तांत्रिक कारणास्तव बंद केली होती. त्यानंतर 24 जुलैपासून अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.