Talegaon DabhadeNews : राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थिनीला सर्वतोपरी मदत करणार – यादवेंद्र खळदे

एमपीसी न्यूज – आदर्श विद्या मंदिर तळेगाव दाभाडे शाळेतील विद्यार्थिनी तनिष्का अमर घोडके हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत यश मिळवले आहे. तिने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन हे यश मिळवले असून तिच्या शिक्षणासाठी सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे मावळ शिक्षण प्रतिष्ठान संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे यांनी सांगितले. खळदे यांच्या हस्ते तनिष्का घोडके हिचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिक्षक किर्ती मोहरिर, किसन पाटील, स्वाती शिंदे, प्रतिक्षा ढवळे तसेच  राजश्री बनसोडे, संभाजी ठाकूरसह शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मावळ शिक्षण प्रतिष्ठान संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे यांच्या शुभहस्ते या विद्यार्थीनीस शैक्षणिकसाहित्य व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी बोलताना संस्थेचे सचिव यादेवेंद्र खळदे यांनी तनिष्काचे भरभरून कौतुक करून पुढील शिक्षणासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे जाहीर केले. ही मुलगी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आहे. ही गौरवाची बाब आहे.भविष्यकाळ तिच्यासाठी निश्चितच उज्ज्वल असणार आहे. तिने अभ्यासात असेच सातत्य ठेवल्यास कुटुंबासाठी, शाळेसाठी, संस्थेसाठी ती उत्तम कामगिरी करू शकेल असा आशावाद व्यक्त केला.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत आदर्श विद्या मंदिर तळेगाव दाभाडे शाळेतील कु.  तनिष्का अमर घोडके या विद्यार्थीनीने पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. या विद्यार्थीनीस इयत्ता नववी ते बारावी पर्यत वार्षिक बारा हजार रुपये याप्रमाणे चार वर्षात शिक्षणासाठी 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

मार्गदर्शक शिक्षक किर्ती मोहरिर,किसन पाटील, स्वाती शिंदे, प्रतिक्षा ढवळे तसेच  राजश्री बनसोडे यांचेही अभिनंदन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक, प्रकाश शिंदे यांनीही तनिष्काचे व मार्गदर्शक शिक्षकांचे यशाबद्दल अभिनंदन व कौतुक केले.

संस्थेचे अध्यक्ष आमदार सुनिल शेळके, उपाध्यक्ष नंदकुमार काळोखे, कान्हु पडवळ, सचिव यादवेंद्र खळदे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थीनी  तनिष्का व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक प्रकाश शिंदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.