BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : तंबाखू सिगारेट उधार न देण्यावरून तरुणाला बेदम मारहाण

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – तंबाखू सिगारेट उधार देत नसल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी साडेचारच्या सुमारास बिजलीनगरकडे जाणाऱ्या रोडवर चिंचवड येथे घडली.

प्रथमेश हुसेन आप्पा हिरेमठ (वय 19, रा. वेताळनगर, चिंचवड) या तरुणाने या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भैय्या वायदंडे, ओमकार हजारे, लक्ष्मण क्षीरसागर, अभिषेक थोरात (सर्व रा. वेताळनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश शनिवारी दुपारी त्यांच्या मित्रांसोबत बिजलीनगरकडे जाणाऱ्या रोडवर मित्रांसोबत रिक्षामध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांच्याच परिसरात राहणारे चार आरोपी त्यांच्याजवळ आले. त्यांनी ‘तू आम्हाला तंबाखू सिगारेट उधार देत नाही’ असे म्हणत प्रथमेशच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. आरोपींनी प्रथमेशवर लोखंडी कोयत्याने वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. ही भांडणे सोडविण्यासाठी प्रथमेशची आई आली असता तिलाही आरोपींनी धक्काबुक्की केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.